ब्रेकींग न्यूज : महाराष्ट्रात निवडणूका जाहीर! 'या' जागांसाठी होणार निवडणूका

29 Jan 2024 14:53:39

Election Commission


नवी दिल्ली :
संपुर्ण देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच आता राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, यावेळी महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणुका होणार आहेत.
 
निवडणुक आयोगाने १५ राज्यांतील ५६ जागांवर निवडणुका होणार असल्याची घोषणा सोमवारी केली आहे. दरम्यान, येत्या २ एप्रिल रोजी १३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. तसेच ३ एप्रिलला दोन राज्यांतील सहा सदस्य हे निवृत्त होत आहेत. याच पार्श्वभुमीवर निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत.

Powered By Sangraha 9.0