'ऑलेक्ट्रा'ची शेअर बाजारात दमदार कामगिरी; तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर

29 Jan 2024 15:33:45
Olectra Greentech Ltd Quarterly Result

मुंबई : '
ई-शिवनेरी' पुरवणाऱ्या आणि एसटी तसेच बेस्ट बसेसची निर्मिती करणाऱ्या 'ऑलेक्ट्रा ग्रीनटेक' कंपनीकडून तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालाच्या माध्यमातून कंपनीच्या नफ्याचा चढता आलेख गुंतवणूकदारांसमोर आला आहे. दरम्यान, 'ऑलेक्ट्रा ग्रीनटेक'ची शेअरच्या बाजारभावात उसळी घेत कंपनीची तिसऱ्या तिमाहीत देखील उत्तम कामगिरी दिसून येत आहे.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) आघाडीची इलेक्ट्रिक बस आणि ट्रकच्या उत्पादक कंपनीने ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिसऱ्या आणि आतापर्यंतच्या नऊ महिन्यांचे एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले. या तिमाहीत, ऑलेक्ट्राने १७८ इलेक्ट्रिक वाहने वितरित केली, २०२२-२३ मध्ये वितरित केलेल्या १४२ च्या तुलनेत वितरणात वाढ २५ टक्के एवढी झाली.

कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के. व्ही. प्रदीप म्हणाले, “आमची उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षमता वाढवण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. आमच्याकडे एक चांगली ऑर्डर बुकींग देखील आहे. ” सीतारामपूर येथे नव्या कारखान्याचे १५० एकरांवर बांधकाम सुरू असून फेब्रुवारी २०२४ मध्ये या नवीन सुविधेतून काही प्रमाणात उत्पादन सुरू करत आहोत. या कारखान्यामुळे आमची उत्पादन क्षमता आणखी वाढेल, असेही ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0