"नितीश कुमारांनी इंडी आघाडीचा अंत्यसंस्कार केला"

29 Jan 2024 12:32:12
 indi
 
नवी दिल्ली : "काँग्रेस कुणालाही रोखण्याचा प्रयत्न करत नाही, इंडी आघाडी जेव्हापासून बनली तेव्हापासून गंभीर आजारांनी ग्रस्त आहे. सुरुवातीपासूनच त्यात विविध प्रकारचे विषाणू आले, नंतर ते आयसीयूमध्ये गेले आणि शेवटी ते व्हेंटिलेटरवर होते. त्यानंतर काल नितीश कुमार यांनी तर अंत्यसंस्कार केले. आता इंडी आघाडीचे काय होणार?" असे वक्तव्य काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केले आहे. आपल्या विधानातून त्यांनी काँग्रेसवर आणि इंडी आघाडीवरच निशाना साधला आहे.
 
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडी आघाडीला रामराम ठोकत, पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीए आघाडीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, नितीश कुमार यांनीच इंडी आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या जाण्याने इंडी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी इंडी आघाडीतून बाहेर पडण्यामागे काँग्रेसचा अहंकार असल्याची टीका केली होती. आता आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सुद्धा काँग्रेसवरच निशाना साधल्यामुळे पक्ष नेतृत्वावर दबाव वाढला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0