राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रताप्रकरणी निकालास मुदतवाढ

29 Jan 2024 18:16:49
NCP MLA Disqualification

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुदतवाढ दिली. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मुदतवाढ मान्य करून आता १५ फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना ३० ऑक्टोबर २०२३ रोजी ३१ जानेवारी २०३१ पर्यंत अपात्रताप्रकरणी निकाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नार्वेकर यांच्यातर्फे मुदत संपण्याच्या दोन दिवस अगोदर मुदतवाढीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.





Powered By Sangraha 9.0