इम्तियाज जलील यांच्याकडून वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन!

29 Jan 2024 18:24:42
Imtiaz Jalil News

परभणी
: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून आपल्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे संविधान गौरव सोहळ्यादरम्यान त्यांनी, स्वा. सावरकर पळपुटे असून आम्ही त्यांना महापुरूष मानत नाही आणि मानणारदेखील नसल्याचे सांगत आपल्या अकलेचे तारे तोडले. खा. जलील यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यासह देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, इम्तियाज जलील यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणीही सावरप्रेमींकडून केली जात आहे.

 
Powered By Sangraha 9.0