भिंद्रनवालेचे पोस्टर हटवण्यावरून तरणतारण गुरुद्वारात हाणामारी!

गुरुद्वारामध्ये खलिस्तान समर्थकांचा निवृत्त कर्नलवर हल्ला!

    29-Jan-2024
Total Views |
Clash at Tarn Taran gurdwara over removal of Bhindranwale’s poster
 
नवी दिल्ली : पंजाबमधील तरन तारनमध्ये खलिस्तानींनी गोंधळ घातला आहे. तिथे खलिस्तान्यांना दहशतवादी भिंद्रनवालेचे छायाचित्र लावू न दिल्याने ते संतप्त झाले. त्यादरम्यान त्यांनी निवृत्त कर्नल हरसिमरन सिंह यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गाडीचे नुकसान झाले. तसेच त्यांना तलवारी आणि काठ्यांनी लक्ष्य करण्यात आले.एका वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, तरन तारनच्या पहुविंद गावात दीप सिंह जन्मस्थान गुरुद्वारामध्ये दि. २८ जानेवारी २०२४ रोजी बाबा दीप सिंह यांच्या जयंतीनिमित्त एक उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी काही खलिस्तान्यांनी खलिस्तानी दहशतवादी भिंद्रनवाले यांचे छायाचित्र लावण्याचा प्रयत्न केला.

या छायाचित्रावर गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त कर्नल हरसिमरन सिंग यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांनी या तरुणांना भिंद्रनवाले यांचे छायाचित्रे तिथून हटवण्यास सांगितले. या तरुणाला हे मान्य नव्हते. फोटो काढण्यावरून हरसिमरन सिंग आणि या तरुणांमध्ये वादही झाला.यानंतर त्यांनी स्वतः ही छायाचित्रे काढली. त्याचा हा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यामध्ये ते छायाचित्राला विरोध करताना दिसत आहे. मात्र, तरुण हे मान्य करत नाही. त्यावेळी सिंह स्वत: छायाचित्र हटवतात. पंरतु तरुण पुन्हा ते छायाचित्र लावण्याचा प्रयत्न करतात. ज्यावरून तिथे वाद निर्माण झाला.


 
दुसऱ्या व्हिडिओमध्ये कर्नल सिंग लोकांना समजावून सांगताना दिसत आहेत की एकतर शीख गुरूंचा फोटो इथे लावावा किंवा बाबा दीप सिंह यांचा फोटो लावावा. मात्र, तरीही तरुण त्यांच्याशी वाद घालत आहेत आणि भिंद्रनवालेचा फोटो लावण्यावर ठाम आहेत.दरम्यान कर्नल हरसिमरन यांनी भिंद्रनवालेच्या छायाचित्राला केलेल्या विरोधामुळे त्यांना खलिस्तान्यांनी लक्ष्य केले. गुरुद्वारातून परतत असताना त्यांच्या कारवर या कट्टरवाद्यांनी हल्ला केला. त्यांच्या कारला घेराव घालून त्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यांच्या गाडीचेही नुकसान झाले. त्यांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांशीही कट्टरपंथीयांनी झटापट केली.




कट्टरपंथीयांनी कर्नल हरसिमरन सिंग यांच्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यांच्या गाडीला घेराव घालून लोकांना लाठीमार करण्यात येत असल्याचे चित्र आहे. काही लोक त्याची गाडी वाचवण्याचाही प्रयत्न करतात. त्यांच्या पुढे जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीलाही घेराव घालण्यात आला.या वादात एक अधिकारी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याशिवाय कर्नल हरसिमरन सिंग यांना वाचवणारे आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन्ही बाजूचे काही लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी कर्नल सिंग यांना सुरक्षित स्थळी नेले आहे.




या प्रकरणाची माहिती मिळताच काही शीख नेतेही येथे पोहोचले आणि त्यांनी कर्नल हरसिमरन सिंग यांच्यावर शीखांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली. कर्नल हरसिमरन सिंग यांनीही आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले, “भिंद्रनवाले यांचा फोटो भाविकांच्या चप्पलांजवळ ठेवल्याने आक्षेप घेतला. याशिवाय त्यांनी गुरुद्वाराबाहेर एक बेकायदेशीर मंडपही लावला होता, त्यासाठी गुरुद्वारा व्यवस्थापकीय समितीकडून परवानगी घेण्यात आली नव्हती.