"राहुल गांधी नव्हे गांधींचा हमशक्ल फिरतोय, लवकरच खुलासा करणार" - सरमांचा मोठा दावा

28 Jan 2024 18:47:59
rahul gandhi 
 
दिसपूर : "राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत बॉडी डबल घेऊन जात आहेत, ज्यांचे स्वरूप आणि पोशाख त्यांच्यासारखाच आहे. बसच्या समोर बसून लोकांकडे पाहणारी व्यक्ती बहुधा राहुल गांधी नसावी. बसमध्ये आठ जण बसण्यासाठी एक खोली आहे, त्यात राहुल गांधी बसतात." असा खळबळजनक दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
पुढे बोलताना सरमा म्हणाले की, "मी लवकरच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बॉडी डबलची माहिती शेअर करणार आहे. मी फक्त बोलत नाहीये, मी काही दिवसांत बॉडी डबलचे नाव आणि पत्ता उघड करेन. फक्त काही दिवस थांबा. दोन दिवसांसाठी दिब्रुगडला जात असून गुवाहाटीला परत येऊन राहुल गांधींच्या बॉडी डबलची माहिती देणार आहे.
 
राहुल गांधीची न्याय यात्रा काही दिवसांपूर्वी आसाममधून जात होती. त्यावेळी राहुल गांधींनी जमावाला पोलिसांविरोध भडकवल्याचा आरोप मुख्यमंत्री सरमांनी केला होता. त्यांना निवडणूकीनंतर अटक करणार असल्याची माहिती सुद्धा सरमांनी ट्विट करुन दिली होती.
 
 
Powered By Sangraha 9.0