'आम्ही इथून हिंदूंना संपवू' - कट्टरपंथीयांची धमकी

25 Jan 2024 15:55:27
 Bareilly
 
लखनौ : उत्तर प्रदेशच्या बरेलीतून एक धक्कादायक घटना घडली आहे. कट्टरपंथी जमावाने प्रभू श्रीरामाची पूजा करणाऱ्या रामभक्तांवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. भोजीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीयापूर हरवंशपूर गावात कट्टरपंथीयांनी अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या प्रसंगी प्रभू श्रीरामाच्या पूजेचे आयोजन केले होते. या पूजेदरम्यान कट्टरपंथी जमावाने रामभक्तांवर दगडफेक केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, २२जानेवारीच्या रात्री अन्वर, नन्हे, रफिक आणि कादिर यांनी येथे पूजा करणाऱ्या रामभक्तांवर दगडफेक केली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे येथे चेंगराचेंगरी देखील झाली. यावेळी कट्टरपंथी तरुणांनी आम्ही इथून हिंदूंना संपवू, अशी धमकीही लोकांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0