हल्लेखोर TMCच्या गुंडांना दणका! फरार शाहजहानच्या घराचे टाळे फोडत टाकला छापा!

24 Jan 2024 18:29:57
 tmc goon
 
कोलकत्ता : तृणमुल काँग्रेसचे नेता शाहजान याच्या घरी बुधवारी २४ जानेवारीला ईडीने छापा टाकला. पश्चिम बंगाल रेशन घोटा्ळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यापुर्वीही त्यांच्या घरी छापेमारी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याने ती छापेमारी यशस्वी झाली नाही. त्यामुळे यावेळी पुर्ण तयारीने छापेमारी करण्यात आली.
 
यावेळी तपास यंत्रणांनी पुर्ण तयारीने छापेमारी केली आहे. तपास यंत्रणांसोबत २४ वाहने होती. ज्यात सुरक्षा कर्मचारीही होते. शहाजानच्या घरी यावेळी कुलुप होते. ते कुलुप तोडुन अधिकारी आत गेले. घराबाहेर १०० सैनिक तैनात करण्यात आले होते.
यापुर्वी याआधी ५ जानेवारी २०२४ रोजी तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या टीम आणि सीआरपीएफ जवानांवर २५०-३०० लोकांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला होता. त्यादरम्यान पत्रकारांवरही हल्ला करण्यात आला आणि अनेक वाहनांची तोडफोडही करण्यात आली होती.
 
कोण आहे शाहजहान शेख?
शाहजहान शेख याला राजकीय पार्श्वभूमी नाही, तरीही त्यानी राजकारणात झपाट्याने प्रगती केली. घरची परिस्थीती हालाकीची असल्याने त्याने ड्रायव्हर, भाजी विक्रेता अशी कामेही केली. छोटी मोठी कामे करत आपल्या संपर्काच्या जोरावर तो येक प्रभावशाली व्यक्ती बनला. २०१३ ला तो टीएमसी मध्ये सामिल झाला. २०२० मध्ये त्याच्यावर दोन भाजप नेत्यांच्या हत्येचा आरोप होता.

Powered By Sangraha 9.0