मणिशंकर यांच्या कन्येलाही मुघल प्रिय! बाबरी ढाँचासाठी केलं उपोषण

24 Jan 2024 16:50:17

Manishankar and Daughter



नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांची ओळख ही वाचाळवीर म्हणूनच कायम आहे. आता हा वारसा त्यांची कन्या सुरन्या चालवत आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी सुरन्या अय्यर हिने उपवास केला. पण हा उपवास रामललासाठी नव्हता तर बाबराच्या पिलावळींसाठी होता.
ही माहिती त्यांनी स्वतः फेसबूक पोस्ट करत दिली आहे. प्राण प्रतिष्ठेच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या आईने तिला एक चमचा मध देऊन उपोषण तोडलं, अशी माहिती त्यांनी दिली आहे. एक दिवस देशात हिंदू मुस्लीम शिख ईसाई आपला पूर्वीचा भारत परत मिळवतील.
उपोषण सुरू झाल्यानंतर ती म्हणते, "दिल्लीच्या प्रदूषणकारी हवेत उग्रवाद, हिंदूराष्ट्रवाद, द्वेष हा ठासून भरलेला आहे. यात अध्यात्माचे विष कालवले आहे. मी हे उपोषण भारतातील मुस्लीमांसाठी करत आहे. अयोध्येत जे हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली जे काही सुरू आहे हे निंदनीय आहे. या दरम्यान मुघलांच्या वारशाची आठवण काढत तिने हुंदका दिलाय, असे ती आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणते.
"मुघलांच्या वारशाशिवाय दिल्लीची कल्पनाच करवत नाही. दिल्लीतील मुघल आक्रमणकारांनी आपल्याला भरपूर काही दिलं. सुफी साहित्य आणि अमीर खुसरोही याचीच देणं आहे. उत्तर भारताची भाषा, संस्कृती खुसरोचीच देण आहे. मुघल हे इथे मुस्लीमांना नमवूनच आले होते. बाबराने पंजाबमध्ये दौलत खान आणि दिल्लीत इब्राहिम लोदीचा पराभव केला होता. मुघलांनी राजपूतांशी नातेसंबंध प्रस्थापित केले. मुघलांची निती ही मंदिरं पतन करणं नव्हती. त्यांनी तर मंदिर बनवली होती.


असत्य, हिंसा, द्वेष आणि बदल्याच्या भावनेतून तयार झालेलं मंदिर कुणाच्या आयुष्यात आनंद कसा आणेल?", असे ती बरळली आहे. सुरन्या अय्यरची बहिणीनेही ही X पोस्ट शेअर केली आहे. सुरन्या स्वतःला बॅरिस्टर म्हणवून घेते. मुलांच्या हक्कासाठी आपण लढत असल्याचेही सांगते. सुरन्या अय्यर ऑक्सफर्ड विद्यापीठातील पदवीधारक आहे. सेंट स्टीफेंस कॉलेजमध्ये गणितातून बीएची पदवीही मिळवली आहे.




Powered By Sangraha 9.0