इंडी आघाडीला मोठा दणका! तृणमुल काँग्रेस स्वबळावर लोकसभा लढवणार
24 Jan 2024 12:35:45
नवी दिल्ली : 'मोदी हटाव' या एकमेव उद्देशाने एकत्र आलेल्या विरोधीपक्षांच्या एकीला उभा तडा गेला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी स्वबळावर निवडणूका लढविणार आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीत एकत्र लढण्याच्या आणाभाका घेणारे सर्वच नेते या निर्णयामळुळे तोंडावर आपडले होते.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि काँग्रेसचा पंतप्रधान सत्तेत बसवावा या हेतून राज्यातील २३ विरोधी पक्ष एकत्र आले होते. या इंडी आघाडीचे प्रमुख समन्वय म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंची निवड करण्यात आली होती. हे सर्वजण एकत्र येऊन मोदी हटावचा नारा देत असले तरीही मोठा झटका ममतांनी त्यांनी दिला आहे.
पूर्वीपासून ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मात्र जागावाटपावर नाराजी व्यक्त केली होती. केजरीवाल यांनी दिल्ली आणि पंजाबमध्ये काँग्रेसला जागा देणार नसल्याचे म्हटले होते. तर ममतांनी काँग्रेससाठी पश्चिम बंगालमध्ये दोन जागा सोडू, तसेच डाव्यांसोबत जाणार नाही, अशी भूमिकाही मांडली होती. ही खदखद सातत्याने बाहेर येत होती.
शिवाय २३ विरोधी पक्षांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी आश्वासक चेहराच कोणत्याही पक्षाकडे नसल्याचे निर्देशित केले होते. ममतांची नाराजी यापूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीवेळीही दिसून येत होती. ममता बॅनर्जींना भारत जोडो न्याय यात्रेसाठी निमंत्रणही नसल्याचे स्पष्ट झाले होते. काँग्रेसपुढे पाठवलेला प्रस्ताव काँग्रेसने मान्य न केल्याने आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे, ममता बॅनर्जींनी यानंतर माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे.