नवी दिल्ली : ज्ञानवापी संकुलाच्या सीलबंद सर्वेक्षण अहवालाबाबत जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीशांनी दिले आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) यापूर्वीच न्यायालयात अहवाल दाखल केला होता.
हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, बुधवारी न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आणि एएसआय प्रत दोन्ही पक्षांना दिली जाईल असे मान्य केले. एएसआयने ई-मेलद्वारे अहवाल देण्यास आक्षेप घेतला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी अहवालाची प्रत घेण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर आता दोन्ही पक्ष प्रतीसाठी न्यायालयात अर्ज करणार असून आज अहवाल प्राप्त होऊ शकतो.