राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि बिग बी यांच्यात झाला खास संवाद

23 Jan 2024 13:12:37

modi and big b 
 
मुंबई : प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत झाली. या ऐतिहासिक सोहळ्याला अनुभवण्यासाठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार देखील उपस्थित होते. यावेळी महानायक अमिताभ बच्चन पुत्र अभिषेक बच्चनसह हजर होते. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मोदींनी उपस्थित मान्यवरांना भेटून त्यांची विचारपूस केली. यावेळी पंतप्रधान बिग बींना हात जोडून अभिवादन करताना दिसले.
 
पंतप्रधान मोदींनी यावेळी बिग बी यांच्या तब्येतीची चौकशी देखील केली. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली होती. त्याविषयीची आठवण काढत मोदी हे बिग बी यांच्या हाताबद्दल चौकशी करताना आपल्याला व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. तुमचा हात बरा आहे का? असा प्रश्न मोदींनी विचारल्यावर अमिताभ बच्चन यांनी स्मितहास्य करत होकारार्थी मान हलवली.
 
 
 
दरम्यान, अयोध्येत कलाविश्व अवतरले होते. यात विकी कौशल, कतरिना कैफ, रणबीर कपूर, आलिया भट्ट, सुभाष घई, जॅकी श्रॉफ, आयुष्मान खुराना, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, मधुर भांडारकर, मनोज जोशी अशा दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0