मुंबई : अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांचा प्रणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यासाठी देश भर उत्साहाच वातावरण होत. भारतभर त्या दिवशी दिवाळी साजरी केली गेली. ठिकठीकाणी शोभा यात्रा, बाईक रॅली काढण्यात आल्या. पण प्राणप्रतिष्ठी सोहळ्याच्या एक दिवस आधी २१ जानेवारीला मुंबईच्या मीरारोड भागात हिंदुंच्या आनंदाला गालबोट लागलं.
मीरारोड भागात राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या दिवशी रात्री १० ते ११ च्या सुमारास संतप्त कट्टरपंथी जमावाने बाईक वर भगवे झेंडे लावुन आनंद साजरा करणाऱ्या जमावावर हल्ला केला. मीरा रोडच्या हैदरी चौकातुन राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा करत जात असताना. कट्टरपंथी जमावाने भगवे झेंडे लावलेल्या गाड्यांवर दगडफोकही केली गेली. काठ्या, लोखंडी सळ्या जे मिळेल त्या हत्याराचा वापर करुन गाड्यांवर व हिंदुंवर हल्ला केला गेला. महीला, लहान मुले याच्यावरही हल्ला केला गेला. यात अनेक गाडा्यांचे नुकसान झाले व ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व घटनेचे विडीओ एक्स वर वायरल होत आहेत.
या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. देशभरातुन याबद्दल प्रतिक्रीया नोदंवल्या जात आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर पोस्ट करत मीरारोडच्या नयानगर भागातुन १३ जणांना अटक केलं गेल्याची माहीती दिली आहे. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
राज्यामध्ये हिंदित्ववादी विचारांच सरकार आहे. त्यामुळे हिंदुवर हात उचलाल तर हल्लेखोर दोन पायांवर घरी जाणार नाहीत. असा इशारा भाजप आमगार नितेश राणेनी दिला आहे. नितेश राणे आज तेथिल परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी मीरा-भाईंदर चा दौरा करणार आहेत.
मीरा रोड च्या नयानगर मध्ये सीआरपीफ च्या रॅपीड अॅक्टन फोर्स (RAF) च्या तुकडीने २३ ला सकाळी रुटमार्च केले. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या तुकडीला तेथे नियुक्त करण्यात आले आहे.