अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी अवतरली कलासृष्टी

22 Jan 2024 11:32:44

ayodhya 
 
मुंबई : संपूर्ण देशातील रामभक्त ज्या ऐतिहासिक दिवसाची गेली अनेक वर्ष वाट पाहात होते तो क्षण आज २२ जानेवारी २०२४ रोजी आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामलललाच्या मंदिराचे उद्घाटन होणार असून मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. साधु महंत आणि विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा भाग होणार आहेत. या सोहळ्याला हिंदी चित्रपसृष्टीतील कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे.
 
रजनीकांत, चिरंजीवी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट, विकी कौशल, कतरिना कैफ, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, रोहित शेट्टी, आयुष्यमान खुराना, विवेक ऑबरॉय, अनुपम खेर, मनोज दोशी, रामचरण, जॅकी श्रॉफ,  सह क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडूलकर देखील अयोध्येत पोहोचला आहे. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापुर्वी मंदिराच्या गाभाऱ्यात जयश्री रामाचा जयघोष सुरु असून गायक सोनू निगम, गायिका अनुराधा पौडवाल, गायक शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजातून रामाची गाणी ऐकायला उपस्थित मान्यवरांना मिळत आहे.
 
 
 
रामललाची प्राणप्रतिष्ठा दुपारी १२:२० वाजता होणार असून हा क्षण पाहण्यासाठी सगळ्यांचेच डोळे आसूसले आहेत. ५०० वर्षांचा प्रभू रामाचा वनवास अखेर संपला असून त्यांच्या जन्मभूमीत त्यांचे स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0