"मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे" - शिल्पकार अरुण योगीराज

22 Jan 2024 17:03:38
ARUN YOGIRAJ
 
लखनौ : “मला वाटते की मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे. मला माझ्या पूर्वजांचे, माझ्या कुटुंबाचे आणि प्रभू रामललाचे आशीर्वाद नेहमीच लाभले आहेत. मला असे वाटते की मी स्वप्नांच्या जगात आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे.” अशी भावना रामललाची मूर्ती घडवणारे शिल्पकार अरुण योगीराज यांनी व्यक्त केली आहे.
 
अरुण योगीराज यांनीच राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या रामललाच्या मूर्तीचे शिल्पकार आहेत. मूर्ती बनवताना अरुण योगीराज यांच्या डोळ्याला दुखापत देखील झाली होती, अशी माहिती अरुण योगीराज यांच्या पत्नींने माध्यमांशी बोलताना दिली होती. मूर्ती घडवत असताना त्यांच्या डोळ्यात दगडाचा धारदार तुकडा घुसला होता. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना अनेक दिवस अँटीबायोटिक्स आणि पेनकिलरवर ठेवण्यात आले होते.
 
म्हैसूरचे रहिवासी असलेले अरुण योगीराज यांनी २००८ साली म्हैसूर विद्यापीठातून एमबीए केले असून काही काळ एका खासगी कंपनीत नोकरीही केली आहे. मात्र, ही नोकरी सोडून त्यांनी कौटुंबिक व्यवसाय निवडला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0