मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? पवारांचं सूचक वक्तव्य

20 Jan 2024 12:01:37

Sharad Pawar


सोलापूर :
आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागवाटपावरून महाविकास आघाडीमध्ये वाद असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एक सुचक वक्तव्य केले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना मविआत घेण्याबाबतही त्यांनी भाष्य केले.
 
शरद पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर असून शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकांसांठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता शरद पवारांनी मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे. राज्यात ४८ पैकी ३५ जागांवर मविआचे एकमत झाले असून बाकी जागांवर चर्चा सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांशी माझं आणि उद्धव ठाकरेंचं बोलणं झालेलं आहे. त्यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा आमचा विचार पक्का आहे, असेही ते म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0