राम मंदिराच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांना दणका!

20 Jan 2024 14:11:48

Ram Mandir


मुंबई :
राम मंदिर उद्धाटनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण सामान्य लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता त्यांना चांगलाच दणका बसला आहे. प्रभु श्री रामांच्या प्रसादाच्या नावाने ॲमेझॉनवर मिठाई विकली जात असल्याची माहिती पुढे आली असून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने याबाबत ॲमेझॉनला नोटीस बजावली आहे.
 
'अयोध्या राम मंदिर प्रसाद' या नावाने ॲमेझॉनवर मिठाई विकून सामान्य जनतेची फसवणूक करण्यात येत होती. यावर कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (सीएआयटी) तक्रारीच्या आधारे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अॅमेझॉला नोटीस बजावली. तसेच यावर ७ दिवसांत उत्तर मागितले. त्यानंतर ॲमेझॉनने आपल्या प्लॅटफॉर्मवरून राम मंदिर प्रसादाची यादी काढून टाकली आहे.
 
येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्धाटन होणार आहे. दरम्यान, त्याआधी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणूकीला बळी न पडण्याचे आवाहन लोकांना करण्यात येत आहे.



Powered By Sangraha 9.0