वन्यप्राणी अपंगालयांसाठी ११.५० कोटींचा निधी!

    02-Jan-2024
Total Views |
Wildlife Treatment Centre

मुंबई
: जखमी वन्यप्राण्यांवर उपचारासाठी नजिकच्या परिसरात उपचार केंद्र नसल्यामुळे वन्यप्राणी दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाच्या विभागांमध्ये वन्यप्राणी अपंगालय उभारण्याचा निर्णय अलिकडेच घेतला. आता त्यासाठी ११ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

उपरोक्त निधीपैकी २०.७१ लाख सागरेश्वर अभयारण्य, ४९.२६ लाख राधानगरी अभयारण्य, ८०.१७ लाख सिरोंचा, ३५ लाख चंद्रपूर, ९६.८२ लाख ब्रम्हपूरी, ३६.४३ लाख पूसद, ५२.७८ लाख वाशिम, ९६.३६ लाख नाशिक, १८.५१ लाख ठाणे, ३३.७१ लाख धुळे, ४९.६१ लाख यावल, १२.३९ लाख जळगाव, ४९.९५ लाख नंदूरबार, ४८.३१ लाख शहापूर, ७४ लाख पुणे आणि पेंच व्याघ्र प्रकल्पासाठी ३ कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.