काँग्रेसचे ७ ते ८ जण कमळावर लढणार! उदय सामंतांचा दावा

02 Jan 2024 16:40:12

Uday Samant


कोल्हापूर :
काँग्रेसचे ७ ते ८ जण कमळावर लढण्यासाठी तयार आहेत, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ते सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून न्युज १८ लोकमतशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सतेज पाटलांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना हे वक्तव्य केले.
 
उदय सामंत म्हणाले की, "काँग्रेसचे ७ ते ८ जण कमळावर लढण्यासाठी तयार आहेत. त्यांची अधिकृत यादी माझ्याकडे आहे. येत्या दोन-चार दिवसांमध्ये ती जाहीर करेन," असे ते म्हणाले. तसेच महायुती अभेद्य असून आम्ही ४८ जागा जिंकू असा आम्हाला आत्मविश्वास आहे, असेही ते म्हणाले आहेत.
 
ते पुढे म्हणाले की, "दोन चार लोकांनी विरोध करुन काहीच फरक पडत नाही. त्यांनी मागच्या पाच निवडणुकांमध्ये असेच वातावरण तयार केले होते. त्यामुळे ते कसे भुईसपाट झाले हे सर्वांनाच माहिती आहे. आता महाराष्ट्रात याहीपेक्षा भयानक पद्धतीने ते भुईसपाट होतील," असा दावा त्यांनी केला आहे.



Powered By Sangraha 9.0