कोरोना रुग्णसंख्येत वाढ; मुंबईत २६ ‘कोरोना’बाधित

02 Jan 2024 20:39:34
Corona update

मुंबई : मुंबईकरांची काळजी वाढवणारी बातमी आहे. मुंबई महापालिका प्रशासनाच्यावतीने मंगळवार, दि. २ जानेवारी रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार, महापालिका क्षेत्रात २६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे दि. १ डिसेंबर ते सद्यःस्थितीत एकूण २५४ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून १३७ सक्रिय रुग्ण आहेत. समाधानाची बाब म्हणजे कोरोनाच्या नव्या विषाणूचा एकही रूग्ण मुंबईत आढळलेला नाही.

रूग्णालयात उपचारासाठी दाखल १९ रुग्णांना पूर्णपणे बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर नवीन तीन रूग्णांना रुग्णाला रूग्णालयात दाखल केले असून दाखल एकूण रुग्णांची संख्या २८ झाली आहे. एकूण ४,२१५ उपलब्ध बेडपैकी १३ बेड वापरात आहेत. सदर कालावधीत ५,२७० चाचण्या केल्या असून मंगळवारी ४४१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

Powered By Sangraha 9.0