किशोरी पेडणेकरांना ईडीचे समन ; कोरोना काळातील बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी होणार चौकशी

19 Jan 2024 17:42:07

kishori

मुंबई :
उबाठा गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अमंलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशीस हजर राहण्यासाठी समन पाठवले आहे. त्यांना गुरुवारी २५ जानेवारीला ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
 
 कोरोना काळातील बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी तात्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली जाणार आहे. यापुर्वीही किशोरी पेडणेकरांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रीया देताना माझ्या हातात नोटीस आल्यावर मी बोलेन अस किशोरी पेडणेकर यांनी म्हटल आहे. 
 
दरम्यान, बारामती Agro चे सीईओ आमदार रोहीत पवार यांनाही ईडीने समन बजावले आहे. रोहीत पवारांना बुधवारी २४ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले गेले आहे.  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या लिलाव प्रकियेत बारामती अॅग्रोने सहभाग घेवुन मुळ कींमतीपेक्षा कमी किंमतीला कारखान्याची विक्री केली होती. त्यासंबंधी आता रोहीत पवारांची चौकशी केली जाणार आहे. 

Powered By Sangraha 9.0