श्रीराम मंदिराच्या स्मरणार्थ पोस्टाचे विशेष तिकीट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले अनावरण

18 Jan 2024 13:12:02
 ram-modi
 
नवी दिल्ली : अयोध्येत दि. २२ जानेवारीला होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जगभरात जय्यत तयारी सुरु आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम जन्मभूमी मंदिरावरील स्मरणार्थ टपाल तिकिटे आणि जगभरातील प्रभू राम यांच्यावर जारी केलेल्या तिकिटांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. ४८ पानांच्या पुस्तकामध्ये अमेरिका, न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, कंबोडिया आणि सयुंक्त राष्ट्रसंघ सारख्या संस्थांसह 20 हून अधिक देशांनी जारी केलेली तिकिटे समाविष्ट आहेत.
 
टपाल तिकिटांसोबतच या पुस्तकात सहा शिक्क्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राम मंदिर, गणेश, हनुमान, जटायू, केवलराज आणि शबरी असे सहा शिक्के आहेत. त्यासोबत वेगवेगळ्या देशांच्या टपाल तिकिटांमध्ये राम मंदिर, चौपई 'मंगल भवन अमंगल हरी', सरयू नदी, सूर्य आणि मंदिराच्या आसपासची शिल्पे यांचा समावेश आहे.
 
पुस्तक प्रकाशनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आणखी एका कार्यक्रमात सामील होण्याची संधी आज मला मिळाली. आज श्री रामजन्मभूमी मंदिरावरील ६ स्मरणीय टपाल तिकिटे आणि प्रभू राम यांच्यावर जगभरातील तिकिटांचा अल्बम जारी करण्यात आला आहे. मी देशातील जनतेचे आणि जगभरातील सर्व रामभक्तांचे अभिनंदन करू इच्छितो."
 
 
Powered By Sangraha 9.0