निमंत्रण मिळालं पण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाही : शरद पवार

18 Jan 2024 16:50:23

Sharad Pawar


नवी दिल्ली :
अयोध्या येथे श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. यातच राज्यसभा सदस्य शरद पवार यांनी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारले आहे. मात्र, दि. २२ जानेवारीनंतर श्रीरामललाचे आपण दर्शन घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
 
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे शरद पवार यांनी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण पाठवले होते. मात्र, आपण हे निमंत्रण नम्रपणे नाकारत असल्याचे पवार यांनी ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांना पत्राद्वारे कळविले. पवार यांनी पत्रात म्हटले की, “मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहेत. अयोध्येतील सोहळ्याविषयी रामभक्तांमध्ये उत्साह आणि उत्सुकता आहे. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद या रामभक्तांकडून माझ्यापर्यंत पोहोचणार आहे."



Powered By Sangraha 9.0