राऊतांना झालयं काय? म्हणे राम मंदिरासाठी मुलायमसिंह यांचंही योगदान!

18 Jan 2024 15:37:13

Raut


मुंबई :
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. यातच आता पुन्हा एकदा त्यांनी राम मंदिरावरून एक विधान केले आहे. उत्तर प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचेही राम मंदिरात योगदान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राऊतांच्या या वक्तव्याचा सगळीकडून विरोध करण्यात येत आहे.
 
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलला प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा पार पडणार आहे. १९९० मध्ये राम मंदिर उभारणीसाठी अनेक कारसेवकांनी आपले बलिदान दिले होते. त्यावेळी समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांवर गोळाबार करण्याचे आदेश दिले होते. हा गोळीबार करण्याचे आदेश देऊन त्यांनीही राम मंदिरासाठी हातभार लावल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
 
१७ जानेवारी रोजी 'सत्य हिंदी' या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राऊतांनी हे विधान केले. मुलायम सिंह यादव यांचेही राम मंदिर उभारणीत योगदान आहे. त्यांनी गोळ्या झाडल्या नसत्या तर हे आंदोलन इतके वाढले नसते, असे संजय राऊत म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0