पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक; दहशतवादी तळावर ड्रोनद्वारे हल्ला

17 Jan 2024 11:24:14
IRAN 
 
इस्लामाबाद : इराणने पाकिस्तानमधील दहशतवादी मिसाईल आणि ड्रोनच्या मदतीने एअर स्ट्राईक केला आहे. १६-१७ जानेवारी २०२४ च्या रात्री बलुचिस्तानच्या एका भागात इराणने हा हल्ला केला होता. जैश-अल-अदल नावाच्या इस्लामिक दहशतवादी गटाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी इराणने पाकिस्तानमध्ये हा हल्ला केला.
 
इराणच्या सरकारी वृत्तसस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या लष्कराने बलुचिस्तान प्रांतातील कोह-सब्ज भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे हा हल्ला केला ज्यामध्ये जैश-अल-अदल दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. बलुचिस्तानचा हा भाग इराणविरोधी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनल्याचा आरोप इराणने केला आहे. पाकिस्तानी मीडियाने स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इराणचा हा हल्ला बलुचिस्तानमधील एका मशिदीवर झाला. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांबाबत इराणने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
 
इराणच्या या कृतीचा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निषेध व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, "पाकिस्तानने इराणने केलेल्या हवाई हद्दीच्या उल्लंघनाचा तीव्र निषेध केला, ज्यामध्ये दोन मुले ठार झाली आणि तीन मुली जखमी झाल्या. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन अस्वीकार्य आहे आणि त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. पाकिस्तान आणि इराण यांच्यात संवादाचे अनेक माध्यम उपलब्ध असताना इराणने असे कृत्य करणे चिंताजनक आहे."
 
या प्रकरणी पाकिस्तानने इराणकडे आपला निषेध नोंदवला आहे. त्यांनी इराणच्या राजदूतालाही परराष्ट्र मंत्रालयात बोलावले आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, या भागातील दहशतवादी घटना सर्वांसाठीच धोका आहे. त्याचे जे काही परिणाम होतील त्याला इराण जबाबदार असेल.
 
इराणला लक्ष्य करण्यात आलेल्या जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेने म्हटले आहे की, इराणने ६ ड्रोनद्वारे हा हल्ला केला आहे. हा दहशतवादी गट इराणच्या सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा दावा करतो. हा सुन्नी इस्लामिक दहशतवादी गट आहे तर इराण शिया बहुसंख्य राष्ट्र आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0