क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मालाही अयोध्येचे आमंत्रण

16 Jan 2024 18:22:04

virat and anushka 
 
 
मुंबई : अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात राजकारण्यांसोबत कलाकारांचाही समावेश असणार आहे. या यादीत नुकतेच भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या नावाची भर पडली आहे.
 
 
 
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केलेला कोहली हा पाचवा क्रिकेटपटू आहे. कोहली सोबत वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
 
अयोध्येशी अनुष्काचे खास नाते 
अभिनेत्री अनुष्का शर्माचे राम नगरी अयोध्येशी खास नाते आहे. अनुष्का शर्माचा जन्म १ मे १९८८ मध्ये अयोध्येतील मिलिट्री रुग्णालयात झाला होता.तिचे वडील अजय कुमार शर्मा अयोध्येत भारतीय लष्कराच्या डोगरा रेजिमेंटमध्ये होते. 
Powered By Sangraha 9.0