नितेश तिवारींच्या 'रामायणा'त कैकयी आणि कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी 'या' अभिनेत्यांची वर्णी

16 Jan 2024 13:43:25

ramayan movie 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत रामायणावर आधारित अनेक चित्रपट आले. आता पुन्हा एकदा २१व्या शतकात दिग्दर्शक नितेश तिवारी हिंदीतील दमदार कलाकारांची फळी घेऊन 'रामायण' हा चित्रपट साकारणार आहेत. अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामा यांच्या भूमिकेत, तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर रावणाची भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार यश साकारणार आहे. आता कैकयी, हनुमान आणि कुंभकर्ण यांच्या भूमिका कोण साकारणार याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
 
'रामायण' हा चित्रपट कधी भेटीला येणार अशीही चर्चा सुरु असून याच वर्षात म्हणजे २०२४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे. तसेच, प्रचंड मोठी आणि तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात आणि दिग्दर्शक कसे हे मोठे शिवधनुष्य निभावतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Powered By Sangraha 9.0