मुंबईतला मानाचा फिल्मफेअर सोहळा रंगणार गुजरातमध्ये

16 Jan 2024 14:37:05

filmfare 
 
मुंबई : हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये संपन्न होणार आहे. याची घोषणा सिनेनिर्माता दिग्दर्शक करण जोहर यांनी मुंबईत झालेल्या फिल्मफेअर पत्रकार परिषदेत केली. '६९वा ह्युंदाई फिल्मफेअर पुरस्कार २०२४' यंदा गुजरात येथे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार आहे. यंदा या सोहळ्याला 'गुजरात टुरिझम'चे विशेष सहकार्य लाभणार आहे. दरम्यान, २०१८ ते २०२३ दरवर्षी फिल्मफेअर पुरस्कार हे मुंबत आयोजित केले जात होते. केवळ २०२० मध्ये हा सोहळा गुवाहाटी येथे संपन्न झाला होता. आणि आता०२४ चा फिल्मफेअर सोहळा गुजरातमध्ये होणार आहे.
 
गुजरातमध्ये २७ आणि २८ जानेवारी रोजी हा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा होणार असून दिग्दर्शक करण जोहर स्वतः या पुरस्कारसंध्येच्या सूत्रसंचालनाची सुत्रे हाती घेणार आहेत. करणार आहे. 'टाइम्स एंटरटेनमेंट डिव्हिजन'चे संचालक रोहित गोपकुमार म्हणाले की, “यंदा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा सलग दोन दिवस २७ आणि २८ जानेवारी रोजी रंगणार आहे. हिंदी सिनेसृष्टीमध्ये वर्ष २०२३मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलाकारांचा सन्मान केला जाईल”. या सोहळ्यात करीना कपूर खान, रणबीर कपूर, वरुण धवन, जान्हवी कपूर, सारा अली खान आदी गुणी कलाकार दमदार नृत्याचे सादरीकरण होणार आहे.
Powered By Sangraha 9.0