भोपाळ : "जी काँग्रेस रामाची होऊ शकत नाही, ती आता कोणाचीही होऊ शकत नाही." अशी प्रतिक्रिया देत मध्य प्रदेशतील ग्वालियर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि तीनवेळा नगरसेवक आनंद शर्मा दि. १५ जानेवारी सोमवारी मकर संक्रांतीच्या दिवशी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला.
आपला राजीनामा देताना आनंद शर्मा म्हणाले की, "मी स्वत:चा अपमान सहन करू शकतो, पण प्रभू श्री रामाचा नाही. रामापासून दूर जाणाऱ्या काँग्रेस हायकमांडवर पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नाराज आहे. तो शेजाऱ्यांशी डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही, कारण त्यांना एकच प्रश्न आहे की काँग्रेसने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण का नाकारले? या प्रश्नाचे उत्तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे नाही."