जाणून घ्या; तुम्हीदेखील पाहिली नसेल अशी रामभक्ती

15 Jan 2024 18:50:39
kaushambi-ram-naam-sitaram-raam-spiritual-bank

नवी दिल्ली :
कौशांबी येथील रहिवासी असलेल्या ७३ वर्षीय रामचंद्र केसरवानी यांनी रामनाम पुस्तिकेवर २.८६ कोटींहून अधिक वेळा प्रभू रामाचे नाव कोरले आहे. ही पुस्तिका त्यांनी अयोध्येतील आंतरराष्ट्रीय श्री सीता राम नाम बँकेत जमा केली आहे. केसरवाणी हे ऑगस्ट २०१० मध्ये उत्तर प्रदेश राज्य पाटबंधारे विभागातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एप्रिल २०११ मध्ये रामनाम लिहायला सुरुवात केली आणि तेव्हापासून दररोज किमान ५ हजार वेळा त्यांनी प्रभू रामाचे नाव कोरले आहे.

दरम्यान, अयोध्येतील अध्यात्मिक बँकेबद्दल अधिक माहिती म्हणून आंतरराष्ट्रीय श्री सीता राम नाम बँक राम नगरी अयोध्या धाम येथील मणि राम की छावनी परिसरात स्थित आहे. त्याचबरोबर, याच अध्यात्मिक बँकेच्या भारतभर सुमारे १३६ शाखा आहेत. केसरवानी म्हणाले, “मोक्ष मिळवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे लाल शाईने रामनाम लिहिणे आणि सीताराम बँकेत जमा करणे".
Powered By Sangraha 9.0