शेकडो कारसेवकांचे प्राण वाचविणाऱ्या महिलेने १९९० च्या आठवणींना दिला उजाळा; म्हणाली, काँग्रेस फक्त....

15 Jan 2024 16:48:42
karsevaks-eyewitness-who-gave-shelter-to-125-karsevaks

नवी दिल्ली :
‘मुस्लीम मतांसाठी मुलायम सिंह यादव यांनी १९९०मध्ये अयोध्येत कारसेवकांवर गोळीबार केला. त्यावेळी काँग्रेस फक्त बघत राहिली', असा खुलासा कारसेवकांवर करण्यात आलेल्या गोळीबारादरम्यान प्रत्यक्षदर्शी राहिलेल्या महिलेने केला आहे. त्या म्हणाल्या, मुलायम सिंह यादव यांनी मुस्लिम मतांसाठी हे केले. कारसेवक काही करत नव्हते, ते फक्त 'जय राम-श्री राम' म्हणत बसले होते. आणि हिंदू-मुस्लिमचा प्रश्नच नव्हता," असेही त्या यावेळी म्हणाले.

त्या पुढे म्हणाल्या, ७५ वर्षीय महिला आणि तत्कालीन मुलायम सिंह यादव सरकारने अयोध्येत कारसेवकांवर १९९०मध्ये केलेल्या गोळीबाराच्या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या ओम भारती यांनी स्वतःला सुमारे १२५ कारसेवकांना वाचविण्यासाठी त्यांच्या घरी आश्रय दिला तेव्हाचा अनुभव त्यांना आठवला. विशेष गोष्ट म्हणजे दि. २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा त्यांच्यासाठी खास आहे कारण त्यांनाही या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे.

तसेच, राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्यावर त्या अतिशय भावूक झाल्या आणि सर्व रामभक्तांचे स्वप्न आता पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0