"संजय राऊतांचे तीन अवयव निकामी!" अमोल मिटकरींचा दावा

15 Jan 2024 18:12:10

Sanjay Raut & Amol Mitkari


अकोला :
संजय राऊतांचे तीन अवयव निकामी झाले आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. अकोला येथील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते.
 
अमोल मिटकरी म्हणाले की, "माणसाच्या एकूण इंद्रियांपैकी संजय राऊत यांची तीन इंद्रिये निकामी झाले आहेत. मेंदू, जीभ आणि डोळे ही ती तीन इंद्रिये आहेत. ज्यावेळी ही तीन इंद्रिये काम करत नाही तेव्हा अशी बेताल वक्तव्ये येत असतात. त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू आहे. त्यामुळे त्यांचं ऑपरेशन करणं महत्वाचं आहे. एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्ष गेला असून थोड्याच दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकालही आमच्या बाजूने लागणार आहे. पक्ष आणि पक्षचिन्ह आम्हालाच मिळणार आहे," असेही ते म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0