आप खासदाराकडून पंतप्रधानांचे कौतुक; रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना ऐतिहासिक दिवस

15 Jan 2024 17:56:56
AAP Rajyasabha Member on shri ram mandir inauguration

नवी दिल्ली :
भारताचा माजी क्रिकेटर तथा आप खासदार हरभजन सिंग याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. कौतुक करताना हरभजन सिंग म्हणाला, रामलल्ला यांचा जीवन अभिषेक हा देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. यावेळी हरभजनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत दि. २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.


तो पुढे म्हणाला, राम लल्ला यांचा प्राणप्रतिष्ठापनेवेळी होणारा अभिषेक हा देशवासियांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. दरम्यान, खासदार हरभजन सिंगने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून तो म्हणाला की, ते रामललाला भेटण्याची वाट पाहत आहेत. रामलल्लाची भेट होण्याकरिता फक्त काही दिवसांचा अवधी आहे, त्यानंतर आपल्या सर्वांची भेट होणार आहे.
Powered By Sangraha 9.0