नवी दिल्ली : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मुलीला केंद्र सरकारनने मोठा धक्का दिला आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी वीणा विजयन यांच्या कंपनीविरोधात केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. वीणा विजयन यांच्या Xlogic या आयटी कंपनीच्या विरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अनियमिततेच्या आरोपावरून केरळ राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि सीएमआरएलच्या विरोधात चौकशी केली जाईल.
प्राथमिक चौकशीनंतर बेंगळुरूमधील रजिस्ट्रार ऑफ कंपनीजने दिलेल्या अहवालाच्या आधारे शुक्रवारी रात्री चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यात म्हटले आहे की Xalogic चे व्यवहार योग्य नाहीत. कंपनी कायद्यांतर्गत विविध उल्लंघने आणि गुन्हे आढळून आल्याचेही उघड झाले आणि तपासाची शिफारस करण्यात आली.
वीणाच्या कंपनीला सीएमआरएल या खाण कंपनीकडून १.७२ कोटी रुपये मिळाल्याचा आरोप आहे. वीणा यांच्या कंपनीला हा पैसा कोणत्याही कामाविना देण्यात आला होता. त्यामुळे काँग्रेसचे आमदार मॅथ्यू कुझालंदन यांनी हा मुद्द्या उपस्थित केला होता.