नवी दिल्ली : "संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व दिल्यास सुरक्षा परिषदेची विश्वासार्हता आणखी वाढेल." असे मत बेल्जियमचे माजी पंतप्रधान यवेस लेटरमे यांनी व्यक्त केले आहे. भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा देताना ते म्हणाले की, "संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) ला २१ व्या शतकातील वास्तविकतेशी जुळवून घेणे आवश्यक आहे, कारण त्यासाठी २० व्या शतकात स्थापन केलेल्या संरचनांच्या पलीकडे जाणारे प्रतिनिधित्व आवश्यक आहे."
पीटीआयशी संवाद साधताना लेटरमे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देखील कौतुक केले. ते म्हणाले की, "मोदींनी भारताचा भौगोलिक राजकीय दर्जा उंचावण्याचे काम केले आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला अनेक अधिकार मिळाले आहेत." लेटरमे यांनी भारत आणि युरोपला जोडणाऱ्या प्रस्तावित मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (आयएमईसी) वर देखील आपले मत व्यक्त केले.
लेटरमे म्हणाले की, " बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) ला पूरक आणि पर्यायी मार्ग ठरण्याची क्षमता इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये आहे."