'रेड २' चित्रपटात अजय देवगणला खलनायक म्हणून टक्कर देणार 'हा' मराठी अभिनेता

13 Jan 2024 11:42:35

raid 2 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक, बायोपिक किंवा मग सिक्वेल चित्रपटांचीच रांग दिसून येते. काही दिवसांपूर्वी अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रेड’ चित्रपटाचा सिक्वेल ‘रेड २’ येणार असे घोषित करण्यात आले होते. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली असून अजय देवगण समोर यावेळी पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता रितेश देशमुख दिसणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा अजय आय.आर.एस अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत झळकणार आहे.
 

raid 2 
 
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘रेड’मध्ये अभिनेता अजय देवगणसोबत अभिनेत्री इलियाना डीक्रूज प्रमुख भूमिकेत दिसली होती. मात्र, आता ‘रेड २’ चित्रपटात अभिनेत्री वाणी कपूर पाहायला मिळणार आहे. तसेच, खलनायकाच्या भूमिकेत रेड मध्ये अभिनेते सौरभ शुक्ला दिसले होते. तर आता रेड २ संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा अभिनेता रितेश देशमुख ‘रेड २’ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापुर्वी रितेशने ‘एक विलेन’ आणि ‘मरजावा’ या चित्रपटांत खलनायक साकारला होता. त्यामुळे लवकरच रेड २ चित्रपट प्रदर्शित होणार असून अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर यांचा धमाकेदार अभिनय प्रेक्षकांना १५ नोव्हेंबर २०२४ ला चित्रपटगृहात पाहता येणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0