नाटकाचे दिग्दर्शन करणे अवघडच – पार्थ भालेराव

13 Jan 2024 16:03:09

parth bhalerao 
 
मुंबई : कॅन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित 'हम दोनो और सूट' हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता पार्थ भालेराव दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. निरंजन पेडणेकर यांचे लेखन असणारे हे नाटक रितिका श्रोत्री सादर करणार आहे.
 
“निरंजन पेडणेकर यांच्याकडे एक खुप सुंदर गोष्ट होती. आणि ती गोष्ट ऐकल्यावर एकपात्री नाटक यातून उत्तम घडेल असे मनात आले. कॅन थेम्बा या साऊथ आफ्रिकन लेखकांनी लिहिलेली एक गोष्ट होती, त्यातून प्रेरणा घेत पेडणेकर यांनी एक कथा लिहिली. आणि त्या नाटकाच्या कथेवर काम करत असताना मी दिग्दर्शकन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी लक्षात आले की नाटकाचे दिग्दर्शन करणे फार अवघड आहे. कारण एकट्याने दिग्दर्शन करताना तुमच्याकडे नट एक असतो पण त्याच्याकडे पात्रे अनेक असतात, अशावेळी या सगळ्यांची सांगड एकत्र करणे हे दिग्दर्शकाचे कसोटीचे काम नक्कीच असते”, असे मनोगत पार्थने 'महाएमटीबी'शी बोलताना व्यक्त केले.
 
 
parth bhalerao
 
पुढे तो म्हणाला की, “१९७०च्या काळातील ही कथा आहे. ही गोष्ट एका अशा कपलची आहे, ज्यांचे नवीनच लग्न झाले आहे, एकमेकांवर प्रेम आहे. तरी बायको नवऱ्याची फसवणूक करत आहे. आता ती असे का करते, हे नवऱ्याला कळल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते, या गोष्टीचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होतो, हे नाटकात पाहायला मिळणार आहे. नातेसंबंध आणि फसवणूक यावर भाष्य करणारे हे नाटक असून यात प्रेक्षकांना ब्लॅक कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे. रितिकाने आपल्या अभिनयाने या व्यक्तिरेखेत रंगत आणली आहे. ही एक क्लासिक कलाकृती आहे. याचा पहिला प्रयोग आज १३ जानेवारी रोजी पुण्यातील दि बॉक्स येथे ९ वाजता होणार आहे.''
 
 
Powered By Sangraha 9.0