मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस नेते मिलींद देवरा हे शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. मिलींद देवरा हे मुंबईतील दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणुक लढवण्यात इच्छूक आहेत. पण काँग्रेस पक्षातू त्यांना तिकीट मिळणार नसल्याने ते शिवसेनेत जाणार असल्याच सांगितल जात आहे.
शिवसेनेचे आमदार व मंत्री उदय सामंत यांनीही यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. एकनाथ शिंदे लोकांसाठी अहोरात्र काम करत आहेत त्यांना मिलींद देवरांसारख्या नेत्याची साथ मिळाली तर शिवसेना चांगल्या प्रकारे वाढू शकते त्यामुळे मिलिंद देवरांची इच्छा असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंच नेतृत्व मान्य कराव आणि शिवसेनेत प्रवेश करावा अस मत उदय सामंत यांनी व्यक्त केल आहे.
सध्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाते अरविंद सावंत हे खासदार आहेत. ते येथुन सलग दोन वेळा खासदार म्हणुन निवडुन आले आहेत. मिलींद देवराही या मतदारसंघातुन माजी खासदार आहेत. यापुर्वीही त्यांनी अरविंद सावंत मोदी लाटेत निवडून आले आहेत. त्यांचा मी पराभव करु शकतो अस मत व्यक्त केल होते.