'छत्रपती संभाजी' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

13 Jan 2024 15:19:39

sambhaji maharaj
 
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छत्रपती संभाजी' चित्रपट काही कारणास्तव रखडला होता. मात्र, आता या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. धैर्याने आणि शौर्याने लढा देणाऱ्या या महान वीराचा इतिहास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट २६ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी बलिदान भूमी वडू बुद्रुक, पुणे येथे या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट केवळ मराठीच नाही तर हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी या भाषांमध्येबी प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
छत्रपती संभाजी चित्रपटात प्रमोद पवार, शशांक उदापूरकर, रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख, कै. आनंद अभ्यंकर, समीर, मोहिनी पोतदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Powered By Sangraha 9.0