लखनौ : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे अर्ध्वयू, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी यासंदर्भात माहीती दिली.
लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती स्थिर नसल्याने ते २२ जानेवारीला अयोध्येत होण्याऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थीत राहू शकतील की नाही याबद्दल शंका निर्माण झाली होती. ती आलोक कूमार यांनी दुर केली आहे.
महाएमटीबीशी बोलताना ते म्हणाले " राष्ट्रीय स्वयंयेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्ण गोपाल आणि मी जेव्हा आडवाणींच्या घरी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो.त्यावेळी चर्चेमध्ये त्यांचा प्रवास, त्यांच्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा अशा सर्व निकषांवर चर्चा केली गेली. कृष्ण गोपाल यांनी चर्चेअंती आडवाणीजींची उपस्थीती या कार्यक्रमासाठी महत्वपूर्ण आहे त्यामुळे आवश्यक ती सर्व व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले."