मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी देण्यास सुरुवात केली आहे. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले आहेत.
शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी विधानसभाध्यक्षांनी यावेळी केली.
शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारीणीकडे अंतिम अधिकार आहेत. शिवसेना प्रमुख कोणालाही पदावरुन काढू शकत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय ग्राह्य धरता येणार नाहीत. अस विधानसभा अध्यक्षांनी म्हटल आहे. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय कार्यकारणीचा पाठींबा नव्हता त्यामुळे एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय ते घेऊ शकत नाहीत असही अध्यक्षांनी म्हटल आहे.