अक्षता वितरणासाठी आलेल्या रामभक्तांना काँग्रेस नेत्यांची शिवीगाळ!

10 Jan 2024 11:33:05
Congress on akshata vitaran

नवी दिल्ली : राजस्थानच्या जयपूरमध्ये रामभक्तांसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. अक्षता देण्यासाठी घरोघरी जाणाऱ्या राम भक्तांच्या गटाचा काँग्रेस नेते जगदीश चौधरी यांनी अपमान केल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

एका वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी अक्षता वाटप करण्यासाठी आलेल्या राम भक्तांच्या एका गटाने कृष्ण कुंज विलास वेलफेअर सोसायटीमध्ये गैरवर्तन केले. हे रामभक्त रामधुन करत असताना सोसायटीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते जगदीश चौधरी आणि उपाध्यक्ष राजीव कुमार बाहेर आले आणि त्यांनी त्यांना शिवीगाळ करून हाकलून दिले.

यावेळी रामभक्तांचा जत्था हातात भगवे झेंडे घेऊन जय सियाराम-जय सियारामचा नारा देत तेथून निघून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर राम भक्तांनी सांगितले की जयपूरमध्ये ते कुठेही गेले, त्यांना सर्वत्र आदर मिळाला. सर्वांनी त्याचे स्वागत केले आहे. मात्र राज्यात भाजपचे सरकार आल्याने काँग्रेसवाले हे सर्व करून आपला राग काढत आहेत.

तर जगदीश चौधरी म्हणतात, “राम हा आमचा आदर्श आहे. आम्ही त्यांना स्वतः मानतो. एखाद्या विशिष्ट पक्षाशी संबंधित असण्याचा अर्थ रामविरोधी असा होऊ शकत नाही. समाजात होत असलेल्या धार्मिक कार्यात मी पूर्ण सहकार्य करतो. माझी प्रतिमा डागाळण्यासाठी काही लोकांनी निराधार बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला, ज्याला माझा विरोध आहे. हे लोक नाटक करतात. आम्ही खरा राम मानतो. आम्ही सकाळ संध्याकाळ रामाची पूजा करतो. या आणि माझे घर बघा. मी देवाविरुद्ध कधीही जाऊ शकत नाही.”


Powered By Sangraha 9.0