'सांस्कृतिक कॉरिडॉर - जी २० डिजिटल संग्रहालय' एक अद्वितीय आंतरराष्ट्रीय प्रकल्प

08 Sep 2023 20:01:59
Cultural Corridor - G20 Digital Museum

सांस्कृतिक कॉरिडॉर

भारत मंडपम्, या जी २० शिखर परिषदेच्या ठिकाणी 'सांस्कृतिक कॉरिडॉर - जी २० डिजिटल संग्रहालय' हा एक अद्वितीय आंतरराष्ट्रीय प्रकल्प प्रदर्शित करण्यात आला आहे. हा 'सांस्कृतिक कॉरिडॉर जी २० सदस्य देश आणि आमंत्रित देशांच्या सामायिक वारशाचे प्रतिनिधित्व आणि उत्सव साजरा करत आहे . या कॉरिडॉरमध्ये जी २० सदस्य देश आणि ९ आमंत्रित देशांचा वारसा असलेल्या प्रतिष्ठित आणि उल्लेखनीय सांस्कृतिक वस्तू समाविष्ट केल्या आहेत.

हा सांस्कृतिक कॉरिडॉर विविध सांस्कृतिक अभिव्यक्ती समजून घेण्यासाठी आणि त्यांची प्रशंसा करण्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण, सर्वसमावेशकता तसेच समानता आणि सामायिक ओळखीची भावना वाढवण्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ म्हणून काम करत आहे .

डिजिटल भारत एक्स्पेरीयंस झोन

भारत मंडपम् येथील दालन क्रमांक ४ आणि १४ मध्ये स्थापित केले आहे डिजिटल भारत एक्स्पेरीयंस झोन अर्थात अनुभव क्षेत्र. इथे अभ्यागतांना भारताद्वारे प्रथमच राबविल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा अनुभव घेण्याची अनोखी संधी मिळत आहे . हे क्षेत्र डिजिटल भारताच्या महत्त्वाच्या उपक्रमांबाबत महत्वपूर्ण अंतर्दृष्टी प्रदान करेल. Ask GITA - मार्गदर्शन, प्रेरणा, परिवर्तन आणि कृती यांच्यासह अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने भगवद्गीतेच्या प्राचीन ज्ञानाची जोड देणारे माध्यम. या दालनामध्ये MyGov, CoWIN, UMANG, जन धन, e NAM, GSTN, FastTag आणि सरकारच्या अशा इतर अनेक उपक्रमांचाही समावेश असेल.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवोन्मेष दालन

Cultural Corridor - G20 Digital Museum

भारतीय रिझर्व्ह बँक जी २० शिखर परिषदेदरम्यान वित्तीय परिदृश्यात क्रांतिकारक बदल घडवुन आणण्याच्या आपल्या क्षमतेला दर्शवणाऱ्या स्पर्धात्मक वित्तीय तंत्रज्ञानाचे सादरीकरण या दालनात आहे. यामध्ये भारताच्या वित्तीय क्षेत्रातील नवोन्मेषच्या असामान्य अशा वैशिष्ट्यांचा समावेश असेल. यामध्ये केंद्रीय बँक डिजिटल चलन, डिजिटल पद्धतीने कागदविरहित स्वरूपात सहजसुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक तंत्रज्ञान व्यासपीठ आणि युनिक देयक प्रणाली अंतर्गत असलेली यूपीआई वन वर्ल्ड, रूपे ऑन द गो आणि भारत बिल पेमेंटद्वारे सीमा पार बिल देयके इत्यादी उत्पादनांचा समावेश आहे.

देयक प्रणाली अनुभव केंद्र यूपीआई वन वर्ल्ड

Cultural Corridor - G20 Digital Museum

यूपीआई वन वर्ल्ड ची रचना भारतात येणाऱ्या अशा परदेशी पर्यटकांसाठी केली आहे ज्यांची भारतात बँक खाती नाहीत. परदेशी नागरिक त्यांच्या भारतातील वास्तव्यादरम्यान निःशुल्क आणि सुरक्षित देयकांसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस शी संलग्न असलेल्या प्रीपेड पेमेंट इंस्ट्रुमेन्टचा वापर करू शकतात.

भारतात येणाऱ्या प्रतिनिधींना यूपीआई वन वर्ल्ड वर २००० रुपये दिले जाणार असून यूपीआयच्या माध्यमातून त्यांच्या इच्छेनुसार ते ही रक्कम वापरू शकतील. 

हस्तकला बाजार

भारत मंडपम मधील दालन क्रमांक तीन मध्ये हस्तकला बाजार उभारला आहे. यामध्ये भारताच्या विविध भागांमधील हस्तकला कौशल्याच्या उत्पदनांचे प्रदर्शन मांडले आहे ज्यामध्ये एक जिल्हा एक उत्पादन आणि जी आय टॅग असलेल्या वस्तूंवर विशेष भर आहे . याद्वारे प्रतिनिधी आणि आमंत्रितांना भारतातील स्थानिक उत्पादनांची खरेदी करण्याची अनोखी संधीमिळाली आहे.

Cultural Corridor - G20 Digital Museum

 या हस्तकला बाजार मध्ये ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच खादी आणि ग्रामोद्योग आयोगासारख्या केंद्रीय संस्था, भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ -ट्राईफेड यांची उत्पादने समाविष्ट आहेत . याशिवाय या प्रदर्शनात कारागिरांचे कौशल्य आणि त्यांची अजोड कला यांची झलक पाहता यावी या उद्देशाने कुशल कारागीर आपल्या कारागिरीचे प्रत्यक्ष सादरीकरण करणार आहेत.

Powered By Sangraha 9.0