मुंबई : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान(AIIMS), नागपुर येथे रिक्त जागा भरण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एम्स नागपूर मधील 'सीनियर रेसिडन्ट' च्या विविध रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ४२ जागा उपलब्ध आहेत. पात्र उमेदवार दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर २०२३ असावे.
तसेच, या रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर, उमेदवारांना अर्ज करताना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. याकरिता सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना ५०० रुपये तर एससी/एसटी वर्गातील उमेदवारांना २५० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे.