ITI प्रशिक्षणार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत नोकरीची संधी

07 Sep 2023 15:27:36
SAMEER Recruitment For ITI Trainee

मुंबई :
'इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय' अंतर्गत आयटीआय उत्तीर्णांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रायोगिक सूक्ष्मतरंग इलेक्ट्रॉनिकी इंजिनियरी तथा अनुसंधान संस्था (एसएएमईईआर) मध्ये अॅप्रेंटिस पदावर प्रशिक्षणार्थी म्हणून १ वर्षासाठी निवड करण्यात येत आहे.

दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना कुशल ट्रेड्समॅन बनविण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ज्ञान देण्यात येणार आहे. या करिता इच्छुक उमेदवारांना मुलाखतीकरिता आवाहन करण्यात येत आहे. ज्या उमेदवारांनी दोन वर्षांच्या कालावधीसह आयटीआय अभ्यासक्रम उत्तम गुणांनुसार पूर्ण केला असेल ते या मुलाखतींसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

पुढील पदांकरिता उमेदवारांना संधी असणार आहे.

फिटर, टर्नर, मशीनिस्ट या पदांकरिता दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखत असेल.

ड्राफ्टसमॅन या पदासाठी दि. दि. १२ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखत असेल.

इलेक्ट्रिशियन, आयटी अँड एसएम दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखत असेल.

एयर कंडीशनिंग मैकॅनिक, PAASA दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखत असेल.

इलेक्ट्रॉनिक मैकॅनिक दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखत असेल.

वरील सर्व पदांकरिता वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहेत. तरी भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Powered By Sangraha 9.0