जय जवान गोविंदा पथकाचे विक्रमी नऊ थर!

07 Sep 2023 15:09:52
 
Jai Jawan Govinda squad
 
 
मुंबई : दरवर्षी महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षीही राज्यात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा होत आहे. अशात राजकीय नेत्यांनी दहिहंडी कार्यक्रमांची जोरदार तयारी केली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आयोजित वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने विक्रमी नऊ थर रचत सलामी दिली आहे.
 
वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने सुरुवातीला नऊ थर लावण्याचा केलेला पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र, दुसऱ्याच झटक्यात जय जवान गोविंदा पथकाकडून नऊ थरांची यशस्वी सलामी देण्यात आली. जय जवान गोविंदा पथकाने तीन एक्क्यांचे थर लावले. यानंतर प्रताप सरनाईक यांनी गोविंदाना शुभेच्छा दिल्या.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0