मल्याळम अभिनेते आणि दिग्दर्शक जॉय मॅथ्यू यांचा अपघात

06 Sep 2023 12:22:38

joy mathew 
 
केरळ : मल्याळम अभिनेते आणि दिग्दर्शक जॉय मॅथ्यू यांचा सोमवारी भीषण अपघात झाला. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात त्यांच्या कारचा अपघात झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंडलमकुन्नू येथील चावक्कड-पोन्नानी महामार्गावर जॉय मॅथ्यू यांच्या कारची एका व्हॅनला धडक बसल्याने अपघात झाला असून यात मॅथ्यू आणि व्हॅनच्या चालक जखमी झाले आहेत.
 
जॉय मॅथ्यू यांच्या अपघाताबाबत एका पोलिस अधिकाऱ्यांनी 'पीटीआय'ला माहिती देत म्हटले की, 'मॅथ्यू यांचा ड्रायव्हर कार चालवत होता. या अपघातात मॅथ्यू यांच्या नाकाला किरकोळ दुखापत झाली तर व्हॅन चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान, मॅथ्यू यांची प्रकृती स्थिर असल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
जॉय मॅथ्यू यांनी १९८६ साली अम्मा अरियान या चित्रपटातून आपल्या कारकिर्किदीची सुरुवात केली. यानंतर २०१२ मध्ये त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवत 'शटर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
Powered By Sangraha 9.0