नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) अंतर्गत ६८ रिक्त पदांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

06 Sep 2023 18:11:54
Narcotics Control Bureau Recruitment 2023

मुंबई :
 नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एनसीबीमधील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी एनसीबीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत 'इंटेलिजन्स ऑफिसर' पदाच्या ६८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२३ असणार आहे.

तसेच, या रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षांच्या आत असणे गरजेचे आहे. तसेच, शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा असून अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक १, विंग क्रमांक ५, आर.के.पुरम, नवी दिल्ली -११००६६.


Powered By Sangraha 9.0