Health Department Recruitment 2023: महाराष्ट्र आरोग्य विभागात १०,९४९ पदांसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू

06 Sep 2023 17:34:04
Health Department Recruitment 2023

मुंबई :
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरूवात झाली. सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या काही वर्षांपासून रखडली होती. आरोग्य विभाग 'क' आणि 'ड' गटाच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून पदाच्या आवश्यकतेनुसार उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करावयचा आहे. या भरतीअंतर्गत गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवा कर्मचारी, लिपिक, टायपिस्ट आणि ड्रायव्हर आणि इतर पदांचा समावेश आहे. तर, गट ड संवर्गातील हवालदार, सफाई कामगार आणि इतर अनेक पदांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच, भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. १८ सप्टेंबर २०२३ असणार आहे. त्याचबरोबर भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.




Powered By Sangraha 9.0